
सिदोजीराव निंबाळकर
सिदोजीराव निंबाळकर म्हणजे शिवरायांचे सासरे आणि मुधोजी निंबाळकर यांचे नातू सिदोजीराव प्रतापरावांच्या घोडदळात सामील झाले होते आणि राज्याभिषेकाच्या वेळी ते पंचहजारी मनसबदार देखील बनले होते.
बहलोलखानाशी झालेल्या उमरणीच्या युद्धात सिदोजींनी कमालीचे शौर्य दाखविले होते.
पुढे जालन्यावर मारलेल्या छाप्याहून परतताना, शिवरायांसोबत लूट पुढे पाठवत शत्रूला अडवण्याची जबाबदारी सिदोजींनी पेलली होती. शिवछत्रपतींचे प्राण आणि स्वराज्याची संपत्ती वाचवण्याच्या या मोहिमेत त्यांना वीरमरण आले होते.