बापूजी मुद्गल देशपांडे
बापूजी मुद्गल देशपांडे म्हणजे आदिलशाहीचे मानाचे हवलदार ! पण अगदी सुरुवातीच्या दिवसांपासूनच बापूजींनी शिवराय व जिजाऊसाहेबांना साथ द्यायचे ठरवले होते. सिंहगड घ्यायची पहिली मोहीम बापूजींनी फक्त आपल्या वाक्चातुर्याने पार पाडली होती. दुसऱ्यांदा सिंहगड घेतानाही त्यांचे मार्गदर्शन लाभले होते.
एव्हढेच नव्हे, त्यांची तिन्ही मुले नारायण चिमणाजी, बाळाजी हे देखील स्वराज्याच्या लढ्यात सक्रीय सहभागी होते. ही तिन्ही मुले शिवरायांचे बालमित्र देखील होते.
त्यांचा नातू केसो नारायण, मुलगा नारायण बापूजी असे दोघेजण अनुक्रमे पुरंदर विजयात आणि सुरत लूटीनंतरच्या लढाईत स्वराज्यासाठी कामी आले होते.