google-site-verification=2eSrD4IMziwMlHreClZlqgzdjW2z1jaH8fxiTuuiNrU fbq('track', 'ViewContent');
top of page
Prataprao Gujar

प्रतापराव गुजर

आपल्या स्वराज्याचे तिसरे सरसेनापती म्हणजे प्रतापराव गुजर! आपल्या घोडदळाचे यशस्वी नेतृत्व प्रतापरावांनी लीलया पार पाडले होते. सुरतच्या छाप्यानंतर परतताना त्यांनी फक्त खजिनाच नाहीतर मुघलांच्या दोन्ही मोठ्या सरदारांना चांगलीच धूळ चारली होती. साल्हेरदुर्गाला जेव्हा ७५ हजार मुलांचा वेढा पडला तेव्हा तो वेढा बाहेरून फोडून ह्यांनी शत्रूला हरवले होते आणि आपण युद्ध जिंकलो होतो.

 

आदिलशहाचा सर्वात मोठा सरदार बहलोलखानाला त्यांनी शरण यायला भाग पाडले होते. खानाला जिवंत सोडून दिल्यावर मात्र त्यांना महाराजांची नाराजी पत्कारावी लागली होती. पुढे जेव्हा बहलोल परत स्वराज्यावर चालून आला तेव्हा काही विचार न करता त्यांनी बहलोलच्या मोठ्या सेनेवर एकट्यानेच आक्रमण केले आणि युद्धक्षेत्रावरच त्यांच्यामागे आलेल्या सहा जणांससह वीरगतीस प्राप्त झाले होते.

bottom of page