रघुनाथ बल्लाळ अत्रे
रघुनाथ बल्लाळ अत्रे म्हणजे शहाजीराजांनी शिवरायांसोबत पुणे सुभ्यावर पाठवलेल्या अनुभवी स्वराज्ययोद्ध्यांपैकी एक!
स्वराज्याला जेव्हा थेट मोहिमा काढताना सुयोग्य राजकारणाचीही जोड असणारे नेतृत्व हवे होते तेव्हा रघुनाथ बल्लाळ अत्रे ह्यांनी ती उणीव भरून काढली होती.
जावळीच्या विलीनीकरणाची मोहीम, दाभोळ बंदर स्वराज्यात आणणे, स्वराज्याचा कोकण किनारपट्टीवर विस्तार करणे, शिवरायांचे सावत्र मामा असलेल्या मोहित्यांच्या सुपे प्रभागावर छापा टाकून तो स्वराज्यात विलीन करून घेणे, अफजल वध अशा अनेक मोहिमा रघुनाथ बल्लाळ अत्रे ह्यांनी यशस्वीपणे राबवल्या.