google-site-verification=2eSrD4IMziwMlHreClZlqgzdjW2z1jaH8fxiTuuiNrU fbq('track', 'ViewContent');
top of page

Acerca de

Website Banner Durgaotsav 1.jpg

दुर्गोत्सव २०२१

नमस्कार!
आपण सर्वांनी दुर्गोत्सवात घेतलेल्या सहभागाबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. 
छत्रपती शिवाजी महाराजांनी संख्येने कमी असलेल्या सैन्यासह बलाढ्य शत्रुसैन्याला तोंड देताना "सह्याद्री जनरल"चा वापर हा त्यावर नवे दुर्ग बांधून अथवा जे होते त्यांना मजबूत करून केला होता. स्वराज्यप्रस्थापनेमध्ये जेव्हढे महत्त्व महाराजांसाठी लढलेल्या स्वराज्ययोद्धयांना होते तेव्हढेच दुर्गांना!!! 


आपण वर्षानुवर्षे दिवाळीत आपल्या अंगणात दुर्गबांधणी करतो ते स्वराज्यलढ्याच्या त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी. 

आपल्या स्वतःच्या वेळेत आपल्या मुलांच्या करमणुकीसाठी म्हणून आपण आपल्या राबवत असलेला हा उपक्रम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक मोठी लोकचळवळ म्हणून पुढे आणण्याच्या आमच्या पहिल्याच प्रयत्नात त्याला दिलेल्या अमोघ प्रतिसादासाठी आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या सहभागाबद्दल, आपणास महापौर पुणे श्री मुरलीधर मोहोळ ह्यांच्या स्वाक्षरीचे स्तुतिपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करून घेता येईल. 


ह्या शिवाय आपल्या सहभागाबद्दल टीम मावळाकडून आपणास मावळा - ह्या बोर्ड गेम वरती १०० रुपयांची थेट सूट मिळवता येईल. 

प्रत्येक सहभागी व्यक्तीस एक गिफ्ट कोडे देण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लहान मुलांपर्यंत अगदी खेळता खेळता पोहोचवण्याच्या दृष्टीने बनवला गेलेला आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळांच्या संकल्पनांची स्पर्धा टॉयकॅथॉन जिंकलेला एक साऱ्या कुटुंबाने खेळावे असा अभिनव बोर्ड गेम - मावळा!

आम्ही पुन्हा एकदा आपले आभार मानतो,वरती सांगितलेल्या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी "download now" येथे क्लिक करा!

bottom of page